

प्रतिनिधी लहू लांडे
श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दत्तनगर ,खरपुडी बुद्रुक. ता. खेड येथे उत्साही वातावरणात सुरू आहे. आज दिनांक १३ डिसेंबर २०२४ शुक्रवार रोजी ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज दौंडकर (दौंडकरवाडी) यांचे सुश्राव्य कीर्तन रुपी सेवा झाली . आपल्या कीर्तनामध्ये देवाचे नामस्मरण जर केले नाही तर मनुष्य जन्माचे सार्थक होणार नाही. सुख हे नामात आहे पैशात नाही. संसाराचे अनुभव वेगळे असतात आणि परमार्थातले अनुभव चांगलेच असतात. वकृत्वाच्या माध्यमातून रडवणे, हसवणे पैसे कमवणे सोपे असते. पण लोकांना ज्ञानमृत देणे अवघड आहे. सुख पाहिजे असेल तर संतांच्या संगतीत जावे आणि दुःख जर पाहिजे असेल तर दुर्जनांच्या संगतीत जावे. बुद्धीचा विकास होण्यापेक्षा मनाचा विकास होणे फार गरजेचे आहे. बुद्धीही विकासाने संपत्ती मिळवून देईल. मनाच्या विकासामुळे ज्ञानोबा,तुकोबाचे विचार मिळून माणसाने कर्म चांगले केले तर फळे देखील चांगलेच प्रामाणिक माणसे कोणालाही घाबरत नाही.पंढरीची वारी आणि घाटाची वारी ही खेड तालुक्याची शान आहे. असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. लेक वाचवा आणि लेक शिकवा हा तोला मोलाचा संदेश दिला. महाराजांनी अनेक वेगवेगळे दाखले देऊन सर्व भाविक भक्तांची मने जिंकली. यावेळी गायक म्हणून ह .भ. प. निवृत्ती महाराज थोरात, बबन पवळे ,मारुती पराड, मल्हारी भोगाडे, काळुराम काळे, दत्तात्रेय बरबटे ,आबा भगत, काटकर महाराज यांनी सुरेख असे गायन केले .हार्मोनियमची साथ ह. भ .प. साहेबराव पोटवडे यांनी दिली. पखवाद वाद्याची साथ पाबळचे ह.भ. प. कृष्णा महाराज पिंगळे यांनी दिली. पत्रकार दत्ता भगत यांनी महाराजांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. अनेक भाविक भक्तांनी या कीर्तनरुपी सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चे विद्यमान संचालक व खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच जयसिंग भोगाडे, मा. सभापती दशरथ गाडे, अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग खेड तालुका सुजाता पचपिंड, सामाजिक कार्यकर्त्या सविता भोगाडे आणि खरपुडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, अनेक भाविक भक्त , ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे आयोजन आणि नियोजन सुरेख असल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचं कौतुक होत आहे.

