
इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कुल चाकण (चक्रेश्वर मंदिराच्या शेजारी) येथे मंगळवार दि.१७डिसेंम्बर२०२४ व बुधवार दि.१८ डिसेंम्बर २०२४ रोजी पुणे जिल्हा परिषद पुणे ,पंचायत समिती खेड ,खेड तालुका मुख्याध्यापक संघ ,खेड तालुका विज्ञान/गणित अध्यापक संघ,व नवसाह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट चे इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कुल चाकण (चक्रेस्वर मंदिर) ,यांच्या संयुक्त विद्यमाने ,खेड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ आयोजित केले आहे.अशी माहिती इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका सौं अर्चना मंगळूर, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.अमोल जंगले,खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री संजय बोरकर व खेड तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब वायकर यांनी दिली. या प्रदर्शनाची जय्यत तयारी नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट चे इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल, चाकण (चक्रेश्वर मंदिराच्या शेजारी) चे अध्यक्ष मा.श्री.एन डी पिंगळे,सचिव मा.सौ.डॉ.शितल टिळेकर,मुख्याध्यापिका मा.सौ.अर्चना मंगळूर यांनी केली आहे. उदघाटन समारंभ मंगळवार दि.,१७ डिसेंम्बर २०२४ रोजी सकाळी 9:30 वाजता खेड तालुक्याचे आमदार मा.बाबाजीशेठ काळे,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे मा.श्री.संतोष पाटील,माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.डॉ.भाऊसाहेब कारेकर,प्रांताधिकारी मा.श्री अनिल दौंडे ,मुख्याधिकारी चाकण नगरपरिषद मा.श्री.चंद्रकांत भोसले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.प्रमोद वाघ यांच्या शुभ हस्ते होईल व समारोप समारंभ व पारितोषिक वितरण गुरुवार दि.१८ डिसेंम्बर २०२४ रोजी दुपारी 2 वाजता माजी आमदार मा.श्री.दिलीपशेठ मोहिते पाटील ,शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे मा.श्री. संजय नाईकडे,गटविकासअधिकारी मा.श्री.विशाल शिंदे,संपर्काधिकारी मा.श्री.बाळकृष्ण वाटेकर,गटशिक्षणाधिकारी मा.श्री.अमोल जंगले यांच्या शुभहस्ते होईल.
प्रदर्शनाचा मुख्य विषय – शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान
उपविषय- १) अन्नआरोग्य व स्वच्छता
२) आपत्ती व्यवस्थापन
३) नैसर्गिक शेती
४) दळणवळण आणि वाहतूक
५) गाणितीय मॉडेलिंग व संगणकीय विचार
६)कचरा व्यवस्थापन
७) संसाधन व्यवस्थापन
वरील उपविषयावर खालील गटात शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून सहभाग घेऊन दर्जेदार प्रकल्प तयार करून सहभागी व्हावे . तालुका स्तरावर सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे
*गट १-उच्चप्राथमिक आदिवासी ,बिगर आदिवासी व दिव्यांग विद्यार्थी गट (इयत्ता ६ वी ते ८ वी)
*गट २- माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी , बिगर आदिवासी व दिव्यांग विद्यार्थी गट ( इयत्ता ९ वी ते १२ वी)*
*गट ३- प्राथमिक शिक्षक शैक्षणिक
साहित्य निर्मिती फक्त गणित व विज्ञान विषयाचे साहित्य*
*सहभाग ( इयत्ता १ली ते ८ वी पर्यत शिकविणारे शिक्षक) इयत्ता आठवी पर्यत च्या वर्गांना शिकवत असलेले
*गट ४ माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती ( इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यत शिकविणारे शिक्षक)
*गट ५ – प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर यांचे प्रायोगिक साधनाचे प्रदर्शन व स्पर्धा
प्रदर्शनात खालील स्पर्धा चे आयोजन असेल
*विज्ञान प्रदर्शनानिमित्त निबंध,वकृत्व, व प्रश्नमंजुषा व इतर विविध स्पर्धा चे आयोजन केले आहे.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांसाठी खुले राहील.तसेच प्रदर्शनामध्ये सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभागी व्हावे असे आव्हान खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीअमोल जंगले साहेब, नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा.श्री.एन.डी. पिंगळे,खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री संजय बोरकर, खेड तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब वायकर यांनी केले आहे. व नियोजन खेड तालुका विज्ञान अध्यापक संघाने केले आहे.

