
दि १६
रेटवडी (ता.खेड) येथे कृषीदुतांचे स्वागत सरपंच मा.श्रीमती नीलमताई सुभाष हिंगे आणि रेटवडी ग्रामपंचायतीने केले. ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय आंबी येथे शिक्षण घेणाऱ्या कृषिदुतांचे आगमन झाले आहे.
कृषिदूत वेदांत जगदाळे,अविनाश लोखंडे, कुंदन खरात, तुषार दरवडे, अनिकेत आठवले हे पुढील तीन ते चार महिने गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विविध आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त उत्त्पन्न मिळवून देणाऱ्या
पिकपद्धतींची माहिती देणार आहेत.कृषी महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. प्राजक्ता मोडक प्रमुख समन्वयक डॉ. प्रशांत घाडगे, प्रा. पांडुरंग जगताप, प्रा. अविनाश खरे, प्रा. प्रीती नवलकर, प्रा. नीलम बांगर यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. यावेळी सरपंच नीलम सुभाष हिंगे उपसरपंच मा. श्री दिलीप राजाराम डूबे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ भाऊ पारासुर ग्रामपंचायत सदस्य किरण ज्ञानेश्वर पवार, सौ शाकुबाई कान्हू रेटवडे, सौ किशोरी दिलीप पवळे,श्री खंडू किसन पवळे, यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

