करणा-या गुन्हेगाराकडुन चोरीच्या एकुण ०७ मोटार सायकल व त्यांचे सुट्टे भाग हस्तगत करत चोरीचे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३,१०,०००/- लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

Spread the love
प्रतिनिधी.लहू लांडे
मा. पोलीस आयुक्त, श्री विनयकुमार चौबे सोो, पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील मोटार सायकल चोरी वर आळा घालण्याकरिता गुन्हयांचे क्राईम मॅपिंग करुन, नाकाबंदी, पेट्रोलिंग करुन तसेच मोटार सायकल चोरीच्या घटना घडलेल्या घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज पडताळणी करुन गुन्हेगारांचा शोध घेउन मोटार वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल करण्यासाठी वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले आहे.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. नितीन गिते, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करून तसेच घटना घडलेल्या ठिकाणी सीसीटिव्ही फुटेज पाहुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. महाळुंगे पोलीस स्टेशन तपास पथक मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी व आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याव्दारे सातत्यपूर्ण व बारकाईने तपास करत असताना सारख्याच वर्णनाचे तीन इसम वेगवेगळ्या ठिकाणी माटारसायकल चोरी करीत असताना दिसुन आले. त्यांचे बाबत अधिक माहिती घेतली असता सदरचे चोरटे हे मंचर ता. आंबेगाव येथील असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस शिपाई मंगेश कदम यांना मिळाली. तपास पथकाचे अधिकारी सपोनि कल्याण घाडगे व अंमलदार यांनी लागलीच खानवस्ती, मंचर ता आंबेगाव जि. पुणे येथुन सदर इसमांना ताब्यात घेउन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतुन तसेच जवळपासच्या परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन एकूण ०७ मोटार सायकल चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या एकूण ०४ मोटारसायकल व ३ मोटारसायकलचे चेसीस, इंजीन, मॅकव्हिल असे सुटटे भाग हस्तगत करण्यात आलेले असून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

अ.क्र पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
चोरीस गेलेला मा किंमत
०१ महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन
८२२/२०२४ बीएनएस ३०३ (२)
MH09GT6761
५५,०००/-
०२ महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन
८२३/२०२४ बीएनएस ३०३(२)
MH14LW7448
५५,०००/-
३०,०००/-

०३ महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन ०४
०५
८३८/२०२४ बीएनएस ३०३ (२)
MH14JS5093
५५,०००/-
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
२१३/२०२२ भादवि क ३७९
MH32N0399
५५,०००/-
चंदन नगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
MH12TX0837
६०,०००/-
४०९/२०२४ बीएनएस ३०३ (२) तसेच मंवर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण व पारनेर पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर
येथुन चोरी केलेल्या दोन स्प्लेंडर मोटारसायकलचे सुट्टे भाग चेसीस, मॅकव्हील, इंजिन हस्तगत करण्यात आले आहेत.
एकुण जप्त मुदेमाल किंमत ३,१०,०००/- रुपये
अटक आरोपी
१) अतुल ऊर्फ मन्या संदिप गावडे, वय-१९ वर्षे, रा. खाणवस्ती, मंचर ता. आंबेगाव ता खेड जि पुणे
२) गणेश मच्छिंद्र भगत वय १८ वर्षे, रा. रा. खाणवस्ती, मंचर ता. आंबेगाव ता खेड जि पुणे
३) अजित कैलास जाधव वय २३ वर्षे, रा. ठाकरयासी जगुळके खुर्द, ता खेड जि पुणे
(गो/सा चे सुटटे भाग विकत घेणारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents