


आज दि.१७-१२-२०२४ रोजी चाकण शहरामध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदची हाक दिली होती त्या अनुषंगाने चाकण शहरात बंदची हाक देत चाकण नगर परिषदे समोरील रस्त्यावर फलक दाखवून आणि सरकार विरोधी घोषणा देऊन संबंधीत तरूणास परभणी येथील घटणेत पोलीसांकडून झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ संपूर्ण शहरांमध्ये रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन बंदचे आवाहन केले. त्याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप रंधवे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सदानंद गंवई,महाराष्ट्र सदस्य रेश्मा शेख,खेड तालुका अध्यक्ष विशाल दिवे, बाळासाहेब साबळे जिल्हा युवक उपाध्यक्ष, विजय वाघमारे,महिला खेड तालुका अध्यक्ष आशा ताई कुटे, जिल्हा उपाध्यक्ष नंदीनी पवळे, दत्तात्रय गंगावणे,प्रशांत ढवळे,गौतम निंबाळकर, भिमराव सोनवणे,बापू कांबळे,संतोष सातारकर,विद्या गवळी आदी. पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.त्याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप रंधवे यांनी परभणी येथील शहीद सोमनाथ सुर्यवंशी या भीमसैनीकाचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार त्यासाठी रिपब्लिकन सेना आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील आंबेडकरी समाज त्यांना न्याय देण्यासाठी लढेल .तसेच आंदोलनाच्या शेवटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय देखणे यांनी चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघ सर यांना परभणी येथील घटनेच्या निषेधाच निवेदन देण्यात आले.
