


टीबी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कार वितरण
आज दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी खेड तालुक्यातील तीन ग्राम पंचायतीच्या पदाधिकारींना सन २०२३ मधील टीबी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. टीबी मुक्त ग्राम पंचायत निकष हजारी ३० पेक्षा जास्त संशयित तपासणी , हजारी १ पेक्षा कमी क्षय रुग्ण ,सापडलेल्या क्षय रुग्णांना १०० % पोषण योजनेचा लाभ देणे आणि १००% क्षय रुग्ण बरे करणे या निकषाच्या आधारे तालुक्यातील आखतूली आंभु , बोरदरा आणि पराळे या ग्राम पंचायती पुरस्कारासाठी पात्र ठरल्या . पुरस्कार वितरण सोहळा आरोग्य विभाग, पंचायत समिती खेड येथे पार पडला . पुरस्कार स्वीकारण्यासाठी सदर ग्राम पंचायतीचे सरपंच ,उपसरपंच , ग्राम पंचायत अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते . पुरस्कार वितरण सोहळा मा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने , मा सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सुनील भोईर आणि मा नायब तहसीलदार श्री आर. बी . बिजे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला . यावेळी डॉ. इंदिरा पारखे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .
