


खेड/रेटवडी दि.२६
खेड तालुक्यातील रेटवडी
येथील श्री स्वामी समर्थ मंदिर द्वितीय वर्धापन दिन सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला . रेटवडी गावातून स्वामीच्या पादुका आणि पालखी सोहळा मिरवणुक नाम स्मरणाच्या गजरात काढण्यात आली.अनेक धार्मिक विधी आणि संगीत भजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.संपूर्ण रेटवडी परिसर भक्तीमय वातावरणात गुग झाला. सद्गुरु विजय महाराज यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना सुश्राव्य वाणीतून अध्यात्मिक विचाराचे चिंतन सागून सर्व भाविक भक्तांची मने जिंकली. यासमयी रेटवडी,निमगाव, खरपुडी आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. महाआरती झाल्या नंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी राज्य स्तरीय आदर्श निवेदक पुरस्कार विजेते शरद काका वाबळे पाटील यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वामी भक्तांचे स्वागत करून सूत्रसंचलन केले.या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन दिलीप काका पवार अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ आणि स्वामी भक्तांनी केले आहे.