


प्रतिनिधी सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील शिरोली गावातील कुमारी साक्षी संजय सावंत हिने मुंबई शहर आणि मुंबई कारागृह पोलीस पदे निवड झाल्याबद्दल कृष्णपिंगाक्ष वाडा सावंत वस्ती शिरोली या ठिकाणी भव्य नागरिक सत्कार समारंभ करण्यात आला. राजगुरुनगर, शिरोली, होलेवाडी, मांजरेवाडी,रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी,काळुस, वाकी, भाम, आणि परिसरातील अनेक संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख, रिपब्लिकन शेतकरी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष हरीशभाई देखणे, लोकनियुक्त सरपंच मुदिताताई देखणे, मांजरेवाडी च्या दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरपंच अनिताताई मांजरे, जय मल्हार विविध कार्यकारी सोसायटीचे खरपुडी खुर्द चे संस्थापक चेअरमन, मा सरपंच संदीप गाडे उपसरपंच मांजरेवाडी चे अशोक मांजरे,शिरोली नगरीच्या पोलीस पाटील निर्मलाताई देखने मा. सरपंच रवीभाऊ सावंत, संजय पवळे, संजय सावंत यांनी तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा दिल्या. तिच्या या निवडीबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी शिरोली येथील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश भाऊ सावंत यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करताना साक्षी सावंत हिने मी जे यश मिळवले आहे .यामध्ये Jm Fit चे संस्थापक अध्यक्ष जालिंदर मांजरे,गुरुजनांनी, आई-वडिलांनी आजी- आजोबांचे आणि मैत्रिणी केलेले मार्गदर्शन हे माझ्या यशाचे गमक आहे असे स्पष्ट मदतीने व्यक्त केले. या कार्यक्रमाचा समारोप शेवटी स्नेह भोजनाने करण्यात आला. विशेष विशेष अशा सदिच्छा शुभेच्छा रेटवडी येथील स्वामी समर्थ मठाधिपती सद्गुरु विजय महाराज आणि कुलस्वामी अंबिका पतसंस्थेचे अध्यक्ष , आदर्श उद्योजक अतुल राक्षे आणि रिपब्लिकन सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय देखणे यांनी दिल्या.