शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना  मनपूर्वक  वंदन*..

Spread the love
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे महिला सुरक्षितता,अस्मिता आणि सन्मान कायम..

प्रतिनिधी. दत्ता भगत सर
उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे छत्रपतींना कृतज्ञतापूर्वक वंदन.

मुंबई दिनांक- १९ फेब्रुवारी.
       विधान भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गो-हे, आमदार राजेश विटेकर,सचिव जितेंद्र भोळे,सचिव विलास आठवले यांनी विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत जयघोष केला.यावेळी विधान भवन अधिकारी,कर्मचाऱ्यांनी महाराजांना वंदन केले.
               छत्रपती शिवाजी महाराज 
यांच्यामुळे अस्मिता,वीरत्व,शौर्यत्व
त्व,देशभक्ती, धर्मभक्ती,त्याच बरोबर सगळ्या समूहाला नेतृत्व करत इतिहास घडविला आहे.शिवाजी महाराज यांनी सत्ता अन्याय,अत्याचाराचा मुकाबला केला ते पाहिल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कार्यामुळे नंतरच्या काळात मराठी साम्राज्य दिल्लीपर्यंत पोहचले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सातत्याने परकिय आक्रमण रोखण्याचे काम केले तसे स्वधर्म देशहिताचा जागविण्याचे कामही केले. शिवाजी महाराजांमुळे महिलांच्या संदर्भात सुरक्षितता, अस्मिता, आणि सन्मान कायम राहिला आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यामध्ये फार मोठे योगदान होते अश्या शब्दात शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents