


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील आदर्श गाव गोसावी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ह .भ. प .साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी (आळंदी देवाची) यांचे सुश्राव्यरूपी कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. त्यांनी नामस्मरण हीच खरी भक्ती आहे .देवाला फक्त भाव लागतो आणि भाव असेल तर देव प्रसन्न होत असतो. शरीरामध्ये जसे नाक महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा असतो .संत आणि देव एकच आहे. भोजन बनवताना नामस्मरणात जर बनवले तर ते आदर्श आणि सात्विक भोजन होते. तप करतानी सहा महिने किंवा बारा महिन्याचे असावे. भक्तीच्या विविध पायऱ्या त्यांनी सांगितल्या विश्वास, संबंध, समर्पण ,जिव्हाळा या संदर्भात अनेक वेगवेगळे दृष्टांत देऊन भाविक भक्तांची मने जिंकली. लेक वाचवा ,लेक शिकवा. लहान मुलांना मोटरसायकल आणि मोबाईल पासून दूर ठेवावे . तरुणांनी नामस्मरणाकडे वळावे असा तोलामोलाचा संदेश त्यांनी दिला. यावेळी या कीर्तन सेवेचे श्रवण करण्यासाठी गोसासी नव्हे तर पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्त आणि गोसाची गावातील आजी-माजी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तन संपल्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कीर्तनाकाराचे सौजन्य आप्पासाहेब अर्जुन गोरडे (मा. सरपंच) बाळासाहेब दत्तात्रेय पुरी( वायरमन) रामदास शंकर काशीद (पि.डी.सी.सी .बँक साहेब) यांनी दिले. अन्नप्रसादाचे दाते मच्छिंद्र सोपानराव गोरडे (पि.एस.आय.) कैलास सोपान गोरडे (अध्यक्ष सु. फाउंडेशन) अंकुश महादू गोरडे( उद्योजक) विजय बाजीराव गोरडे( उद्योजक )यांनी केले. रात्री हरिजागर वाळकेश्वर भजनी मंडळ वाकळवाडी यांनी केला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळ व ग्रामस्थ अखंड हरिनाम सप्ताह चे नियोजन व्यवस्थित पार पडत आहे म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.