,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

९० व्या अखिल भारतीय संमेलनातील कवियत्री सौ .नम्रता नारकर यांचा सौदामिनी हा एक संवेदनशील काव्य संग्रह शनिवार दिनांक १२ / ११ / २०२२ रोजी विद्येचे कलेचे संस्कृतीचे माहेर घर व इतिहासाची साक्ष असलेल्या पुणे पुण्यनगरीत अनेक दिग्गज साहित्तीक राज्यातील विविध भागातील कवी / कवीय त्री यांच्या प्रमुख उपस्थीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ठ कवी साहित्तीक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे प्रमुख विश्वस्त मा. राजन लाखे सरांच्या शुभहस्ते होणार असुन.
मित्र गारव्या सारखा फेम कवी अनंत राऊत , चित्रपत्र निर्माते संदिप राक्षे , दिपकजी जाधव सर , ललित जी कदम सर , नागेश वाहुरवाघ , मधुसुदन घाणेकर , कॉ. महेंद्र जी गायकवाड आदि मान्यवर उपस्थीत राहणार असुन.
हया पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या थेट १३ व्या वंशज डॉ. शितल ताई मालुसरे यांची ही उपस्थीती लाभणार आहे .
प्रसिद्ध कवी , चंद्रकांत दादा वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्री तांचे कवी संमेलन पुणे येथील एस एम जोशी हॉल पत्रकार भवन येथे मोठ्या दिमखादार सोहळ्यानी संपन्न होईल .
