
खेड तालुक्यातील चाकण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक या ठिकाणी खाऊ गल्ली, बाल आनंद मेळावा उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक विविध पदार्थ, फळे, भेळ, वडपाव, इडली असे विविध पदार्थ विक्रीसाठी आणले होते . हे सर्व पदार्थ खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. खाऊ गल्ली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा आदर्श केंद्रप्रमुख विजय सुरकुले, विषय तज्ञ दयानंद शिंदे यांनी दिल्या. मुख्याध्यापक ,जालिंदर दिघे, अभिजीत नाईकडे, सुभाष मुळक, उपस्थित होते. या मेळाव्यासाठी मुख्याध्यापिका सुनीता पोटे ,विषयतज्ञ विजय दहिफळे,व सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले