


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरांमध्ये CYCLOTHON RMPA 2025 निरोगी सुरुवात आशादायी भविष्य जागतिक आरोग्य दिनानिमित्त राजगुरुनगर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आयोजित भव्य सायकल रॅली संपन्न झाली . यावेळी अनेक आरोग्य विषयी फलक आणि घोषवाक्य घेऊन घोषणा दे पूर्ण राजगुरुनगर शहर दनानून सोडले. आरोग्य विषयी आहार कसे घ्यावे .आरोग्य कसे राखावे. व्यायामाचे महत्त्व अशा विविध आरोग्यविषयक फलकाद्वारे सर्व राजगुरुनगर वाशियांमध्ये जनजागृती चे आगळे वेगळे उपक्रम असोसिएशन ने केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष डॉ. प्रमिला बांबळे ,उपाध्यक्ष डॉ. रेणुका ठोंबरे ,सेक्रेटरी डॉ. शितल पवार , सह सेक्रेटरी डॉ. नितीन सुपेकर, सह सेक्रेटरी डॉ. स्नेहल तांबे आणि सर्व डॉक्टर यांनी केले आहे. या भव्य रॅलीमध्ये डॉ. दिलीप बांबळे, डॉ.प्रदीप शेवाळे, डॉ.शिवाजीराव गायकवाड, डॉ.सुभाष खडके, डॉ.विलास काजळे, डॉ. उदय पवार ,डॉ. कुणाल तांबे, डॉ. डॉ.मिलिंद बिचकर डॉ. दीपक गायकवाड , डॉ. रोहन साळुंखे, डॉ. हरेश जगताप, डॉ. योगेश श्रीमंदिलकर, डॉ.सुधीर भालेराव, विशेष करून महिला डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यामध्ये डॉ, नीलम गायकवाड, डॉ.माणिक बिचकर, डॉ. पौर्णिमा कहाणे ,डॉ. रसिका साळुंखे , डॉ.सुनीला श्रीमंदिलाकर डॉ. मंगला वाडेकर आणि सर्वच खेड तालुक्यातील महिला व पुरुष डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आरोग्य दिनानिमित्त राजगुरुनगरवाशी यांना आणि पंचक्रोशीतील लोकांना आरोग्य दिन, आहार आणि व्यायाम यासंदर्भात तोला मोलाचे मार्गदर्शन सर्व डॉक्टर मंडळींकडून मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.