
प्रतिनिधी दत्ता भगत /सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील भैरवनाथ विद्यालय दोंदे तालुका खेड येथील आदर्श मुख्याध्यापिका डॉक्टर सौ नंदा विठ्ठल भोर यांची राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कारासाठी निवड झाली त्यांच्या या कामकाजाचा सर्व लेखाजोखा याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने त्यांची निवड केली आहे पुरस्कार वितरण सोहळा 12 व 13 एप्रिल 2025 रोजी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विश्वेश्वरया सभागृह दापोली तालुका. दापोली जिल्हा. रत्नागिरी या ठिकाणी ठीक सकाळी 10 वाजता होणार आहे. तसेच त्यांना मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे डॉ. सौ नंदा विठ्ठल भोर ह्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले आदर्श मुख्याध्यापक श्री विठ्ठल भोर यांच्या त्या सुविध पत्नी आहेत. तसेच पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने गुणवत्ता संवर्धन स्पर्धेत जिल्ह्यात भैरवनाथ विद्यालय दोंदे प्रथम क्रमांक आला आहे .या यशामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल भैरवनाथ विद्यालय दोंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी , दोंदे गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ आणि खेड तालुक्यातून नव्हे तर पंचक्रोशीतून सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.