

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडमळा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील इयत्ता पाचवीत शिकणारा कुमार आयुष अमर वाघमारे याने मंथन शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात आठवा क्रमांक व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.
त्याला शिष्यवृत्ती परीक्षा व मंथन परीक्षेसाठी सौ प्रीती नागेशअष्टुळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे त्याच्या आई-वडिलांचाही त्याला खूप मोठा पाठिंबा होता. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद दावडमळा यांचेही सहकार्य लाभले. त्यामुळे आज दावडमळा गावाचे नाव राज्यात उंच झाले आहे.