


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील रेटवडी येथील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह भ प बाळशिराम महाराज मिंडे यांचे सुश्राव्य असे किर्तन संपन्न झाले. त्यांनी ज्ञान, भक्ती ,कर्म या विषयावरती अनेक वेगवेगळे दृष्टांत देऊन सर्व भाविक भक्तांचे मने जिंकले. नामस्मरण कसे करावे. नामामध्ये किती ताकद असते. नामच आपल्याला तारू आणि वाचवू शकते. भक्ती मुळे आपले जीवन कसे आदर्शमय होते. देवाला आपल्या भक्ती मधला भाऊ समर्पण करावे. आई-वडिलांचे सेवा हीच खरी ईश्वर. आई-वडिलांची सेवा करा. तुळशीची पवित्र माळ गळ्यात घाला. कोणाचे चांगले नाही करता आले तर वाईट करू नका. नामस्मरण करा. असा तोला मोलाचा संदेश त्यांनी दिला. या कीर्तनरुपी सेवेचे सौजन्य माणिक आप्पा वाबळे पा. अध्यक्ष , शरद भालेकर मा. सरपंच संतोषशेठ घनवट, सोमनाथशेठ पवळे ,ज्ञानेश्वर पवार यांनी दिले .आजची पंगतीचे सौजन्य बारकू पवळे ,गुलाब पवार, बाळासाहेब पवळे, कै. गुलाब पवळे यांच्या स्मरणार्थ दीपक पवळे ह भ प बाळकृष्ण पवळे यांनी दिले आहे. पेटीवादक ,पखवाद वादक ,गायक आणि टाळकरी यांनी महाराजांना मोलाची साथ दिली. यावेळी रेटवडी, खरपुडी आणि निमगाव या परिसरातूनच नव्हे तर पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तन रुपी सेवा संपल्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन अखंड हरिनाम सप्ताह मंडळ, रेटवडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी खेड तालुक्यातील अनेक राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय आदर्श निवेदक पुरस्कार विजेते शरद काका वाबळे पा. यांनी केले आहे.