
बबड्या
मूर्ती लहान पण कीर्ती महान
बैलगाडा क्षेत्रातील एक वादळच असा कोणता घाट नाही जिथं बारी सेकंदाने आतून आणली नाही ज्या निमगाव खंडोबाच्या घाटात दिवसात फक्तं ४ बाऱ्या झाल्या तिथं या फकड्याने आतून टाकून टाळी केली.३२ बैल टाकले पण कोणताच नाही पुरला.किवळेच्या घाटातील ती फळीफोड अन् घाटाचा राजा अजून ही अंगावर काटा आणतो. पाबळ घाटात बेभान पळताना जु वशिंडा वर आले तरी पळतच राहिला . रांजणगाव मधील १२.४४ घाटाचा राजा तळेगाव मधील ११.१३ घाटाचा राजा
आरोळी देताच चीत्याच्या चपळाईने निघणारा तू तळ कसा कादून जायचा समजत सुद्धा नव्हते.खरच तू बादशहा होता आहेस अन् कायम राहशील. कायम आठवणीत राहशील तू किंग बबड्या…
भावपूर्ण श्रद्धांजली