सदर महिलेला चॉकलेट व बडीशेप घेण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, पेंडॉल, व चैन खेचून त्याच्या मोटरसायकल वरून तो चाकण दिशेला पसार झालेला

Spread the love
प्रतिनिधी.लहू लांडे
गुन्हे शाखा युनिट 3 ची उत्कृष्ठ कामगिरी*
गुन्हा घडलेपासून 4 तासात आरोपी ताब्यात

      दि 03/06/2025 रोजी  चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिक्रापूर रोड दरम्यान  विशाल गार्डन सोसायटी जवळ सकाळी 08:30 वा सुमारास समर्थ किराणा स्टोअर्स येथे  महिला फिर्यादी नामे सुमन काशिनाथ शिंदे वय 65 वर्षे  रा चारभुजा सोसायटी चक्रेश्वर रोड चाकण तालुका खेड जिल्हा पुणे  सदर महिलेला चॉकलेट व बडीशेप घेण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, पेंडॉल, व चैन खेचून त्याच्या मोटरसायकल वरून तो चाकण दिशेला पसार झालेला

होता सदर महिलेच्या तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन येथे गु र नं  364/2025 BNS 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने  गुन्हे शाखा युनिट 3 चे वपोनि जितेंद्र कदम सो तसेच स्टाफ यांनी घटनास्थळी भेट देऊन  घटनास्थळाच्या आजूबाजूस सीसीटीव्ही  चेक करून सदर गुन्ह्यातील संशयित गाडीचा  20 किमी  परिसरातील cctv तपासून *पो हवा 1456 भोसुरे व पो शी 2718 सूर्यवंशी* यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे यशवंत दिगंबर सूर्यवंशी वय 32 वर्षे रा सध्या बोरजाईनगर चाकण  ता खेड जी पुणे* यास बोरदरा  गावचे हद्दीत संधार कंपनीजवळ ता खेड जी पुणे येथून ताब्यात घेऊन *चाकण पो स्टे गु र नं 364/2025 BNS 309(4)* दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता  त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे *त्याच्या अंगझडतीत गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 180000/- व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल  पॅशन प्रो गाडी नं
MH 14HE 2493 ही त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे*
           सदरची कामगिरी ही मा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सो, मा पो उपायुक्त संदीप डोईफोडे सो, मा सहा. पो आयुक्त विशाल हिरे सो,यांचे मार्गदर्शनाखाली मा जितेंद्र कदम सो गुन्हे शाखा युनिट 3,पो उपनी जावळे, पो हवा 755 आढारी, पो हवा 1456 भोसुरे, पो शी 2718 सूर्यवंशी, पो शी 2399 बाळसराफ, पो शी 2273 दांगट, पो शी 2883  काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents