
ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय प्रतिनिधींच्या मोठ्या उपस्थितीत ऐतिहासिक निवड पूर्ण
वाकळवाडी (ता. खेड, जि. पुणे) | दिनांक – ०६ जून २०२५
वाकळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पै. नरेंद्रभाऊ संभाजी वाळुंज यांची बिनविरोध निवड आज विशेष सभेत घोषित झाली. ही निवड अत्यंत शांततेत, आनंदमय वातावरणात, आणि ग्रामस्थांच्या एकमुखी पाठिंब्यामुळे व सर्व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.
या निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः गावातील प्रत्येक वयोगटातील नागरिक, महिला बचतगट, युवक संघटना, तसेच सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, माजी सरपंच, आणि ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. एकात्मतेचे दर्शन घडवत ही निवड म्हणजे गावाच्या विकासाची नवी दिशा आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
या निवडीमागील पार्श्वभूमी अशी की, माजी सरपंच सौ. मंगल महादू कोरडे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(३) नुसार ग्रामविकास मंत्री यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर ६ जून रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत पै. नरेंद्र वाळुंज यांची एकमेव वैध उमेदवारी दाखल झाली आणि त्यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
पै. नरेंद्रभाऊ वाळुंज हे एक शिकलेले, युवक नेतृत्व करणारे, विकासाभिमुख विचारसरणीचे नेतृत्व आहे. त्यांची पारदर्शकता, कामाची शैली आणि गावाच्या प्रश्नांवरील बारकाईने लक्ष देण्याची वृत्ती ग्रामस्थांमध्ये आदर निर्माण करणारी आहे. निवडीनंतर वाळुंज यांनी सांगितले की,
“गावाचा सर्वांगीण विकास, महिला व युवकांना सक्षम करणे आणि प्रशासनात