



राजगुरुनगर:- खेड तालुक्यांमध्ये चास येथे दि ४/७/२०२५ गुरुपौर्णिमा’, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्देवो महेश्वरा असा नामाचा घोष चास येथे सुरू . ता. खेड येथे दिनांक ४/७/२०२५ते , १०/७/२०२५ सात दिवस सप्ताह श्री स्वामी सद गुरु शिवदत्त महाराज दत्त मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे सुरू होते प्रत्येक दिवशी होम हवन, अभिषेक पूजा प्रवचन भजन गुरुचरित्र पारायण, सर्व शिष्यगण यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. दिनांक १० गुरुवार सकाळी श्री दत्त पूजा रुद्र अभिषेक पुराहित्य सुरेश रामचंद्र चासकर, शांताराम दहिवडे, केला. होम हवन, गुरु पूजन क झाले .सर्व भक्तगण व शिष्य यांना गुरूंचे दर्शन झाले. सायंकाळी पालखी सोहळा गुरुचरित्र ग्रंथ पालखी मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा संपन्न झाली ह भ.प. वसंत महाराज नाईक रे व ह भ प प्रकाश महाराज गुंजाळ गुरु परंपरा विषयी प्रवचन केले खेड तालुक्यामध्ये चांडोली येथे “गुरुपौर्णिमे ‘ दत्त मंदिर मध्ये स्वामी सद गुरु गवळी महाराज, सर्व शिष्य गण महिला वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये संत जनाबाई महिला भजनी मंडळ सौ रंजना शेंडगे व सर्व भजनी महिला मंडळांनी गायन वादन यातून भजनाचा केला .गुरु पौर्णिमा भजनासाठी तबलावादक संतोष गाडेकर राजगुरुनगर यांनी सहकार्य केले आश्रमामध्ये कार्यक्रम झाला . राजगुरुनगर शहरांमध्ये भीमा नदी किनारी क्रांतिवीर राजगुरू चौक जवळ श्री दत्त मंदिर खालची वेस् येथे भव्य स्वरूपात गुरुपौर्णिमे उत्सव साजरा झाला. कै प्रताप नाना आहे र ( दत्त मंदिर विश्वस्त अध्यक्ष) यांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा कार्यक्रम राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक व मंदिराचे ट्रस्टीचे अध्यक्ष समीर आहेर, सर्व शिष्य गण , सर्व विश्वस्त . मंदिरामध्ये पूजा भजन ,प्रवचन , कार्यक्रम संपन्न करण्यात आला सर्वांना महाप्रसाद देण्यात आला खेड तालुक्यात गुरुपौर्णिमा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला .माननीय हिरामण सातकर ( अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बोर्ड ) राजगुरुनगर सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय सागर पाटोळे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये दत्त मंदिर गुरुपौर्णिमा धार्मिक सोहळा संपन्न झाला