
रोटरी क्लब चाकण तर्फे आज दिनांक १४नोव्हेंबर २०२२ रोजी स्वराज्य शिक्षण संचलित सहयोग विशेष मुलांची शाळा (मतिमंद ) राजगुरुनगर येथे स्वर्गीय पंडित नेहरू यांची जयंती .याचे औचित्य साधून शाळेत बालदिन उत्साहात साजरा केला.
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुल द्यावीत
ज्यांचे सुर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावित
त्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळीने पाणी द्यावे .
आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून द्यावे.
आभाळा एवढी त्यांची उंची ,त्यांनी थोड खाली यावे.
मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावर घ्यावे …
.खरंच!!!
मतिमंद मुल वाढवणं ही खरंच तारेवरची कसरत असते. या मुलांना वाढवतांना समाजाचा काहीश्या उत्सुक आणि सहानुभूतीपूर्व तर क्वचित उपहासात्मक नाजरांचा सामना करतांना त्यांच्या पालकांची घेणारी ओढाताण तर शब्दातील असते . अस मुल का जन्माला आल? याच उत्तर कोणाकडेही नसतं ,त्यांचा स्वतःचा आणि त्यांचा आई वडिलांचा काहीहि दोष नसतांना त्यांना हे अग्निदिव्य पार पाडाव लागत. या विशेष मुलांसाठी रोटरी क्लब चाकण काही तरी केले पाहिजे या उद्देशाने आज बाल दिवस साजरा केला
रोटरी क्लब चाकण तर्फे आज 14 नोव्हेंबर २०२२ बालदिनाचे औचित्य साधून सहयोग विशेष मुलांची शाळा राजगुरुनगर येथे शाळेतील विशेष मुलांबरोबर बालदिन साजरा करण्यात आला. मुलांना थेरपी साठी पियानो , ड्रॉइंग बुक , वॉशेबल ड्रॉइंग मॅट , शाळेसाठी साऊंड सिस्टीम देण्यात आले. गिफ्ट वाटप करतांना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय होता. शाळेच्या संस्थापिका पुषांजली मराठे मॅडम यांनी रोटरी क्लब चाकण यांचे विशेष आभार मानले. रोटरी क्लब चाकण च्या वतीने AG २३-२४ विनय भुजबळ यांनी मार्गदर्शन करतांना अश्या विशेष मुलांना त्यांच्या काहीही दोष नसतांना पालकांनी त्यांना घरात डांबून न ठेवता ,मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता अश्या शाळेत थेरपी साठी घेऊन यावे. तसेच शाळेसाठी , मुलांच्या हेल्थ साठी रोटरी क्लब तर्फे मदत करण्याचा आश्वासन दिले तर रोटरीचे सचिव संतोष कापुरे मार्गदर्शन करतांना सांगितले की अश्या विशेष मुलांपर्यंत सामाजिक सेवा , आर्थिक , त्यांचा अधिकार त्यांना जो पर्यंत पोहचेल तेव्हा बाल दिवस साजरा करण्यात आपण यशस्वी झाले असे समजू..रोटरीचे अध्यक्ष अनुप दाडगे मार्गदर्शन करतांना शाळेच्या संस्थपिका पुष्पांजली मराठे मैडम तसेच त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षक ,मावशी यांचे कामाचे कौतुक केले . तसेच रोटरीचे ज्येष्ठ सुभाष शिंदे , दर्शना कापुरे मैडम यांनी सुध्दा शाळेच्या कार्याचे कौतुक केले तसेच त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या..