
खुन करुन दृश्यम चित्रपटाचे कथे प्रमाणे प्रेताची विल्हेवाट
महाळुंगे पोलीसांनी २ तासात केली गुन्हयाची उकल दोघे सख्खे भाऊ गजाआड
मौजे निघोजे, ता-खेड, जि-पुणे येथील श्री. धनंजय नवनाथ बनसोडे, वय ४३ वर्ष यांचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय असुन त्यांची ग्लोबल फुड्स नावाची कंपनी आहे. ते दिनांक १५/१२/२०२२ रोजी २२:०० ते दिनांक १६/१२/२०२२ रोजीचे ०९:०० वा चे दरम्यान राहते घरातुन कोठेतरी निघुन गेल्याचे तक्रारी वरुन प्रथम मानव मिसिंग रजिस्टर नंबर ३६६ / २०२२ दाखल करण्यात आली होती…
सदर मानव मिसिंग प्रकरणाचा अधिक तपास करत असताना मिसिंग व्यक्ती धनंजय बनसोडे व नागपुर येथील महिला यांचेमध्ये गेले ३ वर्षापुर्वी फेसबुक सोशल मिडीयाहारे ओळख होवुन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रेमसंबंधाची माहिती समजल्यानंतर धनंजय यांचे घरात पत्नी व मुले सुजित वय २१ वर्ष व अभिजित वय १८ वर्ष यांचेमध्ये वारंवार वाद होऊ लागले. सदरचे प्रेमसंबंध है. मुलांना मान्य नव्हते. त्यामुळे आपली मुले हे आपला घातपात करून जिवे ठार मारतील अशी शंका मयत धनंजय यास आली होती. व तशी शंका मयत धनंजय याने त्याची नागपुर येथील प्रेमिकेस बोलून दाखवली होती. सदर मानव मिसिंग मध्ये महाळुंगे पोलीस चौकी गुन्हा रजि नंबर १९४९ / २०२२ भा.द.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
महाळुंगे पोलीसांनी मयत धनंजय याची मुले सुजित धनंजय बनसोडे, वय २२ वर्ष व अभिजित धनंजय बनसोडे, वय १८ वर्ष यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी वडील धनंजय यांचे नागपुर येथील महिलेशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे वडीलांचा खुन करुन पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केले असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत सदर गुन्हयात अटक करून पुढील तपास चालू आहे.
सदर घडलेली घटना ही अतिशय गंभीर व हिंस्त्र स्वरुपाची असुन महाळुंगे पोलीसांनी कौशल्याचा वापर करुन गुन्हा अतिशय कमी वेळात उघडकीस आणला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, गा. अपर पोलीस • आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- १ श्री विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, विनोद जाधव, चेतन मुंडे, युवराज बिराजदार, अमोल बोराटे, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, अमोल माटे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, भाग्यश्री जमदाडे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील हे करीत आहेत. –
( विवेक पाटील ) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पिंपरी चिंचवड शहर
Rotate screen
त्यामुळे