

आज पोलीस रायझिंग डे सप्ताह निमित्ताने चाकण मधील मुटकेवाडी शाळेत चाकण वाहतूक शाखेच्या च्या वतीने माहितीपर भेट – “पोलिसकाकांशी गप्पा” आयोजित करण्यात आली होती.यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल साहेब,हेड काँस्टेबल रामदास जायभाये साहेब,पोलीस नाईक अमोल गव्हाणे साहेब यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले.वाहतुकीच्या नियमांची माहिती रामदास जायभाये व अमोल गव्हाणे यांनी सांगितली तर बालगुन्हेगारी या विषयावर psi ज्ञानेश्वर झोल यांनी प्रबोधन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील प्रश्न पोलीस काकांना विचारले.अधिकाऱ्यांनी मुलांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.बापूसाहेब सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आशा चव्हाण मॅडम शाळेतील शिक्षिका उज्वला दोडके मॅडम,विजया वाळुंज मॅडम व राजश्री कानडे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर मुख्याध्यापक प्रविणकुमार घोडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.