स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0*
              *बक्षीस वितरण आणि सन्मान सोहळा*
            *अंतर्गत नगर परिषद चाकण न प मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर* यांच्या मार्गदर्शनाखाली

Spread the love

स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0
बक्षीस वितरण आणि सन्मान सोहळा
अंतर्गत नगर परिषद चाकण न प मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ स्पर्धा मध्ये रांगोळी स्पर्धा , स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा , निबंध स्पर्धा , म्युरल स्पर्धा , झिंगल स्पर्धा , आयोजित करण्यात आल्या होत्या त्यानुसार आज झीत्राई मळा प्राथमिक शाळा चाकण ने स्पर्धेत सहभाग घेत विद्यार्थी , विद्यार्थिनी यांनी आपली कलाकृती सादर केली होती.
त्यानुसार प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन न प उपमुख्याधिकारी श्री राजेंद्र पांढरपट्टे सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, आणि सर्व सहभागी विद्यार्थिनी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षिका यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा ही सहभाग प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला आहे .
यावेळी शहर समन्वयक कश्मिरा बडगुजर , शहर सल्लागार अभय मेंढे, सुपरवायझर नरेंद्र भोसले, कारपे प्रतिनिधी शिवाजी दामोदरे , मल्हारी पंडित , अतुल वाघमारे, चांदगुडे महादेव सर्वजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents