
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागासाठी मोठे कार्यालय, अद्यावत प्रयोगशाळा,मनुष्यबळ त्वरित उपलब्ध करून द्यावी —श्री.नितीन गोरे (सदस्य -महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ )
मुंबई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १७९ वी बोर्ड मीटिंग दलामल हाऊस,नरीमन पॉइंट,मुंबई येथे दिनांक ११ जानेवारी रोजी पार पडली,यावेळी मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जरहाड साहेब,सदस्य सचिव व पर्यावरण सचिव प्रवीण दराडे साहेब उपस्थित होते,यावेळी बोर्डाचे राज्य सदस्य नितीन गोरे यांनी बोर्डाच्या विविध विषयांवर आपले मत मांडले,तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागासाठी मोठे कार्यालय,अद्यावत प्रयोगशाळा, अतिरिक्त मनुष्यबळ त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली याला अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून याचे प्रस्ताव मागितले आहेत. तसेच प्रायोगिक तत्त्वावर चाकण नगरपरिषदेसाठी एसटीपी प्लांट चा प्रस्ताव तयार करण्यात यावा व त्याला मंजुरी मिळावी अशीही मागणी केली.
चाकण औद्योगिक वसाहत व पुणे मधील सर्व अन्य औद्योगिक वसाहत यामध्ये औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून मंडळाचे फील्ड ऑफिसर यांची संख्या अत्यंत कमी आहे,प्रदूषण विषयी नागरिकांचे प्रश्न तसेच औद्योगिक कंपन्यांचे समस्या सोडविण्यासाठी भव्य कार्यालय तत्काळ गरजेचे आहे,यामध्ये पुण्यासाठी किमान ५० नवीन कर्मचारी आवश्यक आहेत,तसेच कर्मचारी पेन्शन योजना लागू करणे, पदोन्नती व नवीन भरतीप्रक्रिया हे महत्वाचे विषयही श्री.नितीन गोरे यांनी निदर्शनास आणून दिले,चाकण औद्योगिक वसाहत मध्ये प्रदूषण मापक यंत्रणा व अद्ययावत डिजीटल बोर्ड बसवणे साठी त्यांनी निर्देश दिले.कंपन्यांना लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रमाणपत्र देताना धोकादायक सुचनांचे पालन होत आहे का याचे वेळोवेळी ऑडिट करणे.तसेच पुणे व ठाणे जिल्ह्यात कंपन्यांमध्ये आगी लागल्या आहेत. त्याची चौकशी करण्याचे श्री.नितीन गोरे यांनी मागणी केली आहे.तसेच आळंदीमधील इंद्रायणी नदीचे प्रदुषण कमी करण्यासाठी नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन योजनेचा महाराष्ट्र शासनाच्या ‘अमुत’ योजने मध्ये समावेश केल्याबद्दल त्यांनी महामंडळ व शासनाचे आभार मानले आहेत.

