

दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी “राजमाता जिजाऊ महिला संस्था” यांच्या माध्यमातून “भामचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भांबोली” येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ जयंती साजरी करत असताना आलेले मान्यवर व शाळेतील काही मुलींनी जिजाऊमातांचा पोशाख धारण करून ढोल व लेझीमच्या स्वरात मान्यवरांचे स्वागत व जिजाऊ मातांची प्रतिमा घेऊन मिरवणूक काढण्यात आली, यानंतर सरस्वती पूजन, जिजाऊ माता प्रतिमा पूजन व क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तद नंतर मुलींनी मान्यवरांसाठी व कार्यक्रमांची सुरुवात करण्यासाठी स्तवन, स्वागत गीत व जिजाऊ वंदना गायली हे सर्व झाल्यानंतर भामचंद्र विद्यालयाचे श्री संजय बोरकर सर यांनी शाळेच्या वतीने प्रास्ताविक केले , त्याचबरोबर राजमाता जिजाऊ महिला संस्थेचे खजिनदार श्री राजकुमार रौंदळ यांनी संस्थेच्या वतीने प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर शाळेतील आठवी ते बारावी या मुलींची भाषणे झाली. मुलींनी जिजाऊ माता यांचे चरित्र, त्यांची जडणघडण, त्यांची राजनीती, त्यांची धर्मनिती, त्यांची सहकार नीती यावर भाषणे केली. सर्वांनी मुलींचे खूप केले. मुलींची भाषणे झाल्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगते थोडक्यात मांडली. मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या संस्थापिका सौ रत्नताई पिंगळे देशमुख यांनी मुलींसाठी एक वेगळा विषय मांडला मुलींच्या भावनांना हात घातला तो विषय म्हणजे कधीही न पाहिलेला बाप, रडणारा बाप, आपल्यासाठी झिजणारा बाप, आपल्यावर रागवणारा बाप पण आपल्या तितकच प्रेम करणारा बाप हा कधी मुलींनी जाणला नाही आणि तो जाणावा तो समजावा यासाठी जिजाऊ मातांचे संस्कार खूप बहुमूल्य आहेत आणि आज ते मिळत नाही म्हणूनच संस्थेच्या संस्थापिका रत्नाताई पिंगळे यांनी “राजमाता जिजाऊ आऊसाहेब तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या.” विषयावर विचार मांडले हे विचार मांडत असताना सर्व विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग, आलेले मान्यवर, कर्मचारी वर्ग या सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले हे भावनिक वातावरण बदलण्यासाठी रत्नाताई पिंगळे आणि महाळुंगे पोलीस चौकीच्या पीएसआय संगीता भंडारवाड यांनी मुलींसाठी एक खेळ घेतला. या खेळासाठी 35 मुली घेतल्या, सर्वात पहिल्या मुलीला सहा ओळींचे वाक्य सांगण्यात आले तेच वाक्य तिने दुसऱ्या मुलीच्या कामात सांगायचे होते दुसऱ्या मुलीने तिसऱ्या मुलीच्या तिसऱ्या मुलीने चौथ्या मुलीच्या असे करता करता शेवटच्या मुलीपर्यंत ते वाक्य पोहोचवायचे होते. हे सर्व झाल्यानंतर सर्वात सुरुवातीच्या मुलीला व सर्वात शेवटच्या मुलीला स्टेजवर बोलवण्यात आले आणि सर्वात आधीच्या मुलीला वाक्य सांगण्यास सांगितले त्यानंतर सर्वात शेवटच्या मुलीला वाक्य सांगण्यात सांगितले ही दोन्ही वाक्य ऐकल्यानंतर सर्व मुलींमध्ये हशा पेटला. परंतु यानंतर या खेळावर पीएसआय भंडारवाड मॅडमने हा खेळ का घेतला हे सांगितले. कारण आजच्या वातावरणात आपण जेव्हा वावरत असतो, वागत असतो तेव्हा जी गोष्ट आपल्यापर्यंत येते तीच खरी असेल असे नाही त्यामुळे मुलींनी कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा आणि कसे वागायचे हे सांगितले गेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून महाळुंगे पोलीस स्टेशनच्या पीएसआय संगीता भंडारवार, रील स्टार व समाजसेविका विजया तोडकर लाभल्या होत्या सन्माननीय उपस्थितीत भांबोलीच्या सरपंच सौ शितल पिंजन, सदस्य अक्षदा राऊत, वासुलीच्या सरपंच सौ कोमल पाचपुते व उपसरपंच श्री दीपक लिंबोरे, सदस्य अशोक गावडे तसेच वासुली गावचे माजी आदर्श उपसरपंच श्री सुरेशभाऊ पिंगळे देशमुख तसेच पोलीस पाटील अमोल पाचपुते, अंकुश पिंगळे, रेखा निकम, मंगल घुले व रूपाली घुले उपस्थित होते तसेच राजमाता जिजाऊ महिलेच्या संस्थापिका सौ रत्नाताई पिंगळे देशमुख, उपाध्यक्ष सौ उषाताई पावडे, पुणे जिल्हा अध्यक्ष योगिनीताई जगनाडे, तालुका अध्यक्ष सौ कल्पनाताई पवार तसेच खजिनदार राजकुमार रौंदळ तसेच शाळेतील बुट्टे सर, रोकडे सर व सर्व शिक्षक वृंद हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ढोबळे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार ज्युनिअर कॉलेजच्या मॅडम कुमारी उषा जाधव यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली
प्रतिनिधी,
न्युज रिपोर्टर -विकास जांभुळकर