नवोन्मेष विद्यालयाची नगर परिषदेच्या  सेंद्रिय कंपोस्ट खत प्रकल्पास अभ्यास भेट*

Spread the love

नवोन्मेष विद्यालयाची नगर परिषदेच्या सेंद्रिय कंपोस्ट खत प्रकल्पास अभ्यास भेट

नगर परिषद चाकण, टेनेको इंडिया प्रा ली व कारपे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गद्शनाखाली शहरात आमचं चाकण कचरा मुक्त चाकण निरोगी चाकण अंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0 च्या अनुषंगाने चाकण शहरातील नवोन्मेष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना बिरदवडे मॅडम विद्यालयातील विद्यार्थ्यांचा कंपोस्ट खत प्रकल्प केंद्रास अभ्यास भेट देण्यात आली.
सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे शाब्दिक स्वागत करून त्यांना केंद्रात कंपोस्ट खत प्रकल्पाची माहिती देण्यात आली.
कारपे प्रतिनिधी शिवाजी दामोदरे यांनी कचरा वर्गीकरण बद्दल महिती दिली.ओला कचरा, सुका कचरा हानिकारक कचरा ,इलेक्ट्रॉनिक कचरा यामध्ये येणारे प्रमुख घटक याची सविस्तरपणे माहिती दिली.
नगर परिषदेच्या नोडल अधिकारी कविता पाटील मॅडम यांनी कचरा वर्गीकरण का केले जावे व कचरा वर्गीकरणाचे मानवी जीवन आणि पर्यावरण यावर होणारे फायदे याबद्दल माहिती दिली.
कारपे प्रतिनिधी महादेव चांदगुडे यांनी मिक्स कचऱ्यामुळे उदभवणाऱ्या समस्या ,सुका कचरा कशा प्रकारे रिसायकल होतो, आपण टाकलेल्या सुक्या कचऱ्यातून कचरा वेचक रोजी रोटी भागवतात याची जाणीव करून दिली.
टिकाऊ पासून टाकाऊ हा उपक्रम राबवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना कचऱ्यात टाकून दिलेल्या वस्तू टायर्स रिकाम्या बॉटल्स याची सुशोभीकरण केले जाते याबद्दल माहिती शिवाजी दामोदरे यांनी दिली.
ओला कचरा व ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत प्रकल्प व कंपोस्ट खत कसा बनवला जावा याची सविस्तरपणे माहिती कारपे प्रतिनिधी रेश्मा ढावरे यांनी दिली.
उपस्थित विद्यार्थ्यांना कंपोस्ट खत कसे बनवले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले . कंपोस्ट खताचे प्रकार व ते घरी उत्तमरीत्या कसे बनवले जाईल याची माहिती रेश्मा ढावरे यांनी दिली.
नगर परिषदेचे सुपरवायझर विजय भोसले सर यांनीही मिक्स कचऱ्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सर्व भावी पिढीने आतापासून एकजुटीने कचरा व्यवस्थापन बाबत जागृत राहिले पाहिजे असे सांगितले.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शंका व कंपोस्ट बनवताना येणाऱ्या अडचणी यावर प्रश्न उपस्थित केले व त्यांच्या प्रश्नाचे निवारण (उत्तरे) नोडल अधिकारी कविता पाटील मॅडम व कारपे प्रतिनिधी यांनी केले.
उपस्थित विद्यार्थ्यांनि मिळालेली माहिती बद्दल छान मनोगत व प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
नगर परिषदेचे सुपरवायझर विजय भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानून अभ्यास दौऱ्याची सांगता झाली.
यावेळी नगर परिषदेच्या नोडल अधिकारी कविता पाटील, शहर समन्वयक कश्मिरा बडगुजर, शहर सल्लागार अभय मेंढे ,सुपरवायझर विजय भोसले, मुकादम सुरज गायकवाड, नवोन्मेष शाळेतील शिक्षिका सौ.नयना गुंजाळ,शिक्षिका सौ पल्लवी धवन, कारपे प्रतिनिधी शिवाजी दामोदरे, महादेव चांदगुडे, रेश्मा ढावरे,विद्या आचारी, मल्हारी पंडित आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents