
तळेगाव बाजारपेठेतील सोनार दांपत्याला दुकानात मारहाण
तळेगाव ढमढेरे ता. शिरूर: येथील महेंद्र शहा यांच्या सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महेंद्र जयंतीलाल शहा व सरिताबेन महेंद्र शहा हे दोघेजण दुकान बंद करत असताना अचानक एक युवक दुकानामध्ये आला त्याने शहा दांपत्याला कोणत्यातरी हत्यार सदृश्य वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केल्याने दोघांनी आरडाओरडा केला, याचवेळी शेजारी नागरिकांचा आरडाओरडा सुरू झाल्याने युवक दुकानातील मागील दरवाज्याने पळून गेला मात्र या घटनेमध्ये सरिताबेन शहा या किरकोळ जखमी झाल्या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन आतकर, पोलीस हवलदार किशोर तेलंग, संदीप कारंडे, आत्माराम तळोले, भरत कोळी, पोलीस नाईक जयदीप देवकर, संतोष शिंदे, विकास पाटील, अंबादास थोरे, रोहिदास पारखे यांसह आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी अचानक घडलेल्या प्रकाराने आणि पोलिसांचा ताफा बाजारपेठेत हजर झाल्याने एकच खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता घडलेला सर्व प्रकारचे सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे, तर याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र सर्व तपासा नंतर याबाबतचा प्रकार समोर येईल असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.