
पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा पार पडणार आहे सदर कार्यक्रम
4 व 5 फेब्रुवारी 2023 रोजी असणार आहे
- हा सोहळा जय गणेश लॉन्स , भारत माता चौक , न्यू आळंदी देहू रोड , पुणे नाशिक हायवे मोशीगाव या ठिकाणी
आयोजित केलेला आहे
तरी सदर कार्यक्रमाला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून तसेच विविध ठिकाणावरून भाविक भक्तांची गर्दी होणार आहे
शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता जगद्गुरु श्री संतपिठावर आगमन झाल्या नंतर स्वागत समारंभ होईल तसेच लगेच प्रवचनाला सुरुवात होईल सकाळी 11 नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन संध्याकाळ पर्यंत असणार आहे
रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी नऊ ते आकरा प्रवचन नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन असा दोन दिवसाचा कार्यक्रम संपन्न होत असताना दोन्हीही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे भाविकांनी जगद्गुरुश्रींचा अमृतवाणीचा दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान उपपीठ पश्चिम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक श्री सुधांशू दीपक जाधव सरांनी केले आहे
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था लोक उपयोगी उपक्रम 1)शैक्षणिक उपक्रम : गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य
2) वैद्यकीय उपक्रम : संस्थांच्या वतीने 37 ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीज येथे 24 तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे
3) कृषी विषयक उपक्रम :
गोर गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खाते औषधे शेती अवजारे वाटप केली जातात
4) आपत्कालीन मदत उपक्रम : दुष्काळ पडल्यास संस्थांच्या वतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो
5) अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम :
अंगारे दोरे धुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते
6) दुर्बल घटक मदत उपक्रम :
निराधार महिलांना घरघंटी शिलाई मशीन शेळ्या मेंढ्या दूपत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवले जातात अशा प्रकारे सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान पश्चिम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक श्री सुधांशु दीपक जाधव सर यांनी केले आहे