०६/०४/२०२३पोलीस स्टेशन वाकड -तेलंगना राज्यातुन पुण्यात ‘गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक

Spread the love

०६/०४/२०२३
पोलीस स्टेशन वाकड –
तेलंगना राज्यातुन पुण्यात ‘गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक

२४ किलो २२४ ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण किं.रु. ३,५०,०००/- चा मुददेमाल जप्त

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे धंदयांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांना अंमली पदार्थाबाबत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या..

त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील व पोउपनि, सचिन चव्हाण यांचा गुन्हे प्रकटीकरण पथकाची वेगवेगळी पथके तयार केली. सपोनि संतोष पाटील हे त्यांचे पथकासोबत पेट्रोलींग करीत असताना सपोनि संतोष पाटील यांना विश्वासु बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तेलंगना राज्यातुन गांजाची विक्री करण्यासाठी एक इसम थेरगाव पुणे येथे येणार आहे. सपोनि संतोष पाटील व स्टाफ यांनी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचला. मिळाले बातमी प्रमाणे थेरगाव चौकी समोरील कैलासनगरकडे जाणारे रोडवर, थेरगाव येथे सापळा रचून शंवयीत इसमास शिताफीने घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. सदर इसमास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव राहुल सावन मलके वय ३३ वर्षे सध्या रा.एस २४ / २५२ देवेंद्रनगर, गाजुल रामारम सिकंदराबाद तेलंगणा मुळ गल्ली नं. ०९, नारेगाव, सिडको एमआयडीसी जि.संभाजीनगर असे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या इसमाची रितसर झडती घेतली असता त्याचेताब्यामध्ये एकुण २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आलेने वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ३२५ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (च)(ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीचे ताब्यामध्ये एकुण २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचा किं.रु. ३,४०,०००/- चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीची दि. ०६/०४/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त असून चौकशी चालू आहे.

सदर आरोपी हा जप्त करण्यात आलेला गांजा तेलंगणा राज्यातुन पुण्यात विक्री करता घेवून आल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर आरोपींचे संपर्कात पुणे व पिंपरी चिंचवड मधील कोण आरोपी आहेत याबाबत तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सगो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सतो, पोलीस उप आयुक्त, परि २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त सो, बाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे- १, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे २, सपोनि संतोष पाटील, सपोनि संभाजी जाधव, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषणः कन्हेरकर, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी, राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले पोहवा अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना, अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि कोर्तेय खराडे, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि.. सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

(डॉ. काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, पिंपरी चिंचवड

प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents