

चाकण नगरपरिषद चाकण वर्धापन दिन 06,04,2023
मा. प्रशासक चाकण नगर परिषद चाकण,तथा उपविभागीय अधिकारी खेड , श्री विक्रांत चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत ,आणि नगर परिषद चाकण मा. मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद चाकण 8 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर आणि कर्मचारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यात नगर परिषद सर्व अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली
यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ लिपिक विजय भोंडवे यांनी चाकण नगर परिषद स्थापनेबाबत प्रास्ताविक केले.
मा. मुख्याधिकारी श्री बल्लाळ साहेब यांनी नगर परिषद चे कामकाज आणि वार्षिक कर वसुली , आणि नव्याने डिजिटल कारभार याविषयी सविस्तर माहिती दिली.
मा.उपविभागीय अधिकारी श्री विक्रांत चव्हाण साहेब यांनी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि नगर परिषद चांगले कामकाज करत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि नव्याने कामकाज करण्या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी ,आणि कारपे प्रतिनिधी उपस्थित होते
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970