


खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. दिलीप आण्णा मोहिते पाटिल यांनी ख्रिश्चन बांधवांच्या गुड फ्रायडेच्या पूर्व संध्येस आवर लेडी ऑफ फातिमा संतोषनगर वाकी येथे उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदारांचे स्वागत श्री. पॉल फिग्रेडो यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तर सिस्टर ट्रिसा चोको यांनी शॉल देऊन सत्कार केला, सौ. वृषालीताई देशमुख यांचा सत्कार सौ. रिबेकाताई शिंदे यांनी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन केला, मोबिनभाई काझी यांचे स्वागत श्री. निर्मल साबळे यांनी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी बोलताना आमदारांनी संत येशु ख्रिस्तानी सत्य संय्यम व अहिंसा या मार्गावर चालण्याचा जगाला संदेश दिला व तो आपण आत्मसात केला पाहिजे सर्व धर्माला आपण बरोबर घेऊन गेलो तरच आपल्या गावची राज्याची व देशाची प्रगति होईल सांगितले तसेच समाजबांधवांच्या दफनभूमीसाठीची जागेची अडचण असून लवकरच जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासित केले यावेळी अण्णांनी सर्व भक्ताना भावुक केले चर्चचे धर्मगुरू फादर पिटर अँथोनी यांनी २०२४ ला आपणच आमदार होऊन मंत्रि होणार असे आशीर्वाद दिले आणि प्रार्थना केली. यावेळी नगरसेविका सौ. वैशालीताई देशमुख, बिरदवडीचे सरपंच मा.श्री.दत्तात्रय चौधरी, मा नगरसेवक श्री.धिरज मुटके, राष्ट्रवादी काँग्रेसचे चाकण शहर खेड तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष मा. श्री. मोबिनभाई काझी, ख्रिश्चन पिपल्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निर्मल साबळे, डॉ. सचिन मानेकर, संजय गायकवाड तसेच ईतर मान्यवर आणि आदी पास्टर्स धर्मगुरू उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे