


स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
चाकण नगरपरिषद, टेनेको इंडिया ऑटोमोटिव्ह प्रा ,लि व कारपे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमचं चाकण कचरामुक्त चाकण निरोगी चाकण या अभियानांतर्गत आज दि 6/04/2023 गुरुवार रोजी नगर परिषदेचे 8 वे वर्धापन दिनानिमित्त नगर परिषद पार्किंग या ठिकाणच्या कंपाउंड जाळीवर माझी वसुंधरा सौंदर्यीकरण अनावरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वाचे संवर्धन करण्यासाठी या सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे.
या अनावरण वेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी पांढरपट्टे सर, नोडल अधिकारी कविता पाटील मॅडम, शहर समन्वयक कश्मिरा बडगुजर मॅडम, शहर सल्लागार अभय मेंढे सर, मुकादम विजय भोसले सर, मंगल गायकवाड मॅडम, सर्व महिला स्वच्छता कर्मचारी व कारपे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 8007686970