
बैलाचे शिंग छातीत घुसून युवकाचा मृत्यू
शिक्रापूर : कासारी येथील हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडी शर्यत दरम्यान बैलाच शिंग छातीत घुसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला जिल्ह्यात अशी घटना प्रथमच घडले ही शर्यत युवकाच्या जीवावर बेतल्याने परिसरात शोकाकळ पसरली होती. वृषाल (दादा) बाळासाहेब राऊत वय 33,रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे असे मृत्यू झालेल्या युवकाच नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कासारी व तळेगाव ढमढेरे सीमेवर असलेल्या बैलगाडा घाटावर तळेगाव ढमढेरे व कासारी गावातील बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. या ठिकाणी आपला बैलगाडा घेऊन वृषल राऊत हा देखील त्याच्या कुटुंबासह बैलगाडा घाटावर आला होता. घाटात बैल घेऊन येतानी शेजारच्या बैलाने हालचाली केल्या दरम्यान झालेल्या गोंधळात बैलाच शिंग वृषाल याच्या छातीत घुसले, शिंग हे छातीत खोलवर घुसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सदर घटनास्थळ ठिकाणी असलेले त्याचे सहकारी उमेश राऊत, पत्रकार सचिन दगडे, दत्ता राऊत, दिनेश राऊत, आकाश राऊत यांनी तातडीने वृषाल ला हॉस्पिटल मध्ये दाखल करताच डॉक्टर ने मृत घोषित केले. त्याच्या निधनाची वार्ता पसरताच संपूर्ण शिरूर तालुक्यातील बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन,ग्रामस्थ, त्याचे सहकारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, याबाबत योगेश अरुण राऊत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, प्राथमिक तपास करीत शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7350559916