
शिक्रापूर येथील भाऊ – बहीण झाले पोलीस
शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर येथील पोलीस भरतीचे निकाल जाहीर झालेल्या शिक्रापूर येथील भाऊ-बहिणीने परिस्थिती दोन हात करत पोलिसात भरती होत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले.
व्यवसाय निमित्त वास्तव्यास आलेल्या नारायण सोळंके व गंगा सोळंके हे मुळचे जालना जिल्ह्यातील सावरगावचे त्यांची परिस्थिती हलाखीची त्यांना लक्ष्मण,विजय व राधा ही तीन मुले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनी खूप पोस्ट केले वडील नारायण चहा चा गाडा चालून,तर आई गंगा ही शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत मुले मोठी झाल्यानंतर शिक्षणासह काम धंदा करू लागले.
लक्ष्मण दुचाकी दुरुस्तीचे विजय कंपनीत काम करू लागला मात्र,दुरुस्ती करताना लक्ष्मणने ठरवले की काहीही झाले तरी पोलीस दलात जायचे.राधा महाविद्यालय शिक्षण घेताना आपल्या भावाची पुस्तके वापरून आपण देखील पोलिसाची असे ठरवले,सध्या लक्ष्मण राधा दोघांनी देखील लोणीकंद येथील डिफेन्स कॅरिअर अकॅडमी मध्ये पोलीस भरतीचा सराव केला. जाहीर झालेल्या पोलीस भरतीमध्ये लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके या दोघा बहिण भावांनी यश संपादित करून आई-वडिलांचे स्वप्न साकार
केले, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळे आहेत.त्यांनी सांगितले की आम्ही केलेल्या कष्टाची मुलांनी चीज केले त्यांचे यश पाहून सार्थक झाले.
कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/ 7350559916