
शिक्रापुरात कपड्याच्या दुकानाला आग
शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर येथील एसटी स्टॅन्डसमोरील वामा फॅशन हे कपड्याच्या दुकानाला आग लागुन 1 कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे
शिवाजी धुमाळ यांना दुकानातून धुर येताना दिसला. त्यांनी तातडीने नागरिकांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी आटोक्यात आणली. तर पुणे महा नगर विकास प्राधिकरण चे अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन नितीन माने, फायरमन प्रशांत अडसूळ, मयूर गोसावी, अक्षय नेवसे, सचिन गवळी,संदीप तांबे, रांजणगावच्या अग्निशामक दलाचे केंद्र अधिकारी महेंद्र माळी, मंगेश गावडे, सचिन पाटील,शुभम यादव यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांसह अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत दुकानातील इलेक्ट्रिक साहित्य सीसीटीव्ही तसेच कपडे खाक झाले. आगीचे नेमक कारण समजू शकले नाही.
कु.सचिन संजय दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7350559916