- ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळी भोसरी पोलीसांकडुन अटक + एकुण अदाजे ७,७०,०००/- रुपयाचे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

दिनांक १७/०४/२०२३
- ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळी भोसरी पोलीसांकडुन अटक + एकुण अदाजे ७,७०,०००/- रुपयाचे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
भोसरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही दिवस मध्ये अचानक अॅटो रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते. सदर चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाच्या दोन टिग तयार करण्यात आल्या होत्या. दिनांक ०४/०४/२०२३ रोजी तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना एक ऑटो रिक्षा सह दोन संशयीत इसम जाताना दिसले.. सदर ऑटो रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यांचेकडील ऑटोरिक्षासह जोरात पळुन जावु लागल्याने त्यांचा पाठलाग करून इसम नामे आर्यन प्रमोद भालेराव व सुमित भिम सुर्यवंशी दोघे रा. दापोडी, पुणे यांना त्यांचेकडील ऑटो रिक्षासह ताब्यात घेतले व त्यांना भोसरी पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचे कडे तपास केला. त्यांनी सदरची ऑटो रिक्षा त्यांचा साथीदार पाहिजे आरोपी नामे रिजवान रमजान मुलानी रा. परिवर्तन हौ. सोसा. चिखली, पुणे याचे मदतीने चोरी केल्य चे तपासात निष्पन्न झाले. त्यांना गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आले. पाहिजे आरोपी नामे रिजवान रमजान मुलानी याचा शोध घेत असताना तो एक चोरीच्या अॅटो रिक्षासह मिळुन आला. त्याने सदरची ऑटो रिक्षा वर नमुद आरोपींच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला अटक करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्याचेकडे तपास केला असता वर नमुद तीन्ही आरोपींनी मिळुन आणखी दोन अॅटो रिक्षा व एक मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडुन अंदाजे १,७०,०००/- रुपये किंमतीची ०१ महागडी स्पोर्ट बाईक व अंदाजे ६,००,०००/- रुपये किंमती च्या ०४ ऑटो रिक्षा असा एकुण ७,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन भोसरी पोलीस स्टेशन कडील एकुण ०५ गुन्हे उघडकीस आले आहे. भोसरी पोलीस अधिक त पास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. मनोज लोहीया, मा. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्री. विवेक पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग श्रीमती प्रेरणा कट्टे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे तसेच सहा. पोलीस फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, प्रतिभा मुळे, आशिष गोपी, संतोष महाडीक, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सचिन सातपुते, सागर जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
(विवेक पाटील ) पोलीस उपआयुक्त परिमंडळ- १ पिंपरी चिंचवड.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970