
आळेफाटा प्रतिनिधी :- सुदर्शन मंडले*
आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आज रोजी महिला सुरक्षा संदर्भात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला सदस्य यांची बैठक घेण्यात आलेले असून बैठकीमध्ये खालील प्रमाणे मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहे
१) .सर्व महिला सदस्य यांना महिलांच्या सुरक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले .
२).महिलांच्या विषयीचे कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
३) महिला व मुलींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्या तसेच काय करू नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
४) महिला किंवा तरुणी यांचे संदर्भात होणारे मोबाईल वरून किंवा सार्वजनिक ठिकाणी काय चर्चा चे प्रकार होत असल्यास त्याबाबत काय करावे किंवा काय करू नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
५) महिला मुली लहान मुले यांनी मोबाईल वापरा संदर्भात व त्यापासून होणारे दुष्परिणाम संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोबाईल लहान मुलांपासून कसा दूर ठेवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
६) सध्या सुट्टीचे दिवस चालू असल्याने प्रवासादरम्यान घरामधील ठेवलेल्या मुलांना वस्तू तसेच दाग दागिने यांची प्रवासादरम्यान कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहे .