प्रा. जयवंतराव जगताप यांचा शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व डी.टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने “भव्य सत्कार” कार्यक्रमाचे आयोजन”गुरुवार दिनांक२७ एप्रिल 2023 रोजी सकाळी९:३० ते ११:३० या वेळेत सभागृहामध्ये सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.”दापोडी, पुणे येथील जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय दादासाहेब जगताप व माईसाहेब जगताप यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभिनव कला महाविद्यालय पुणे माजी प्राचार्य आदरणीय प्रा. जयप्रकाश जयवंतराव जगताप याना नुकतेच भारत सरकार नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रेष्ठ व ज्येष्ठ चित्रकार जीवन गौरव पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले. त्यामुळे जनता शिक्षण संस्थेच्या दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी.टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सौ. कल्याणी कुलकर्णी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जयप्रकाश जगताप साहेबांचा सपत्नीक सत्कार सोहळा संपन्न झाला.शाळा प्रांगणातत सत्कारमूर्तींचे व त्यांच्या समवेत असलेल्या कुटुंबीयांचे अवक्षण करून मंत्रमुक्त वातावरणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या व जगताप कुटुंबियांच्या हस्ते प्रशाला प्रांगणातील गुरुवर्य दादासाहेब जगताप आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम स्थळी सर्व मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी जागेवर उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.द्विप प्रज्वलन आणि दादासाहेब जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सत्कार कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती आदरणीय जयप्रकाश जयवंतराव जगताप साहेब, त्यांच्या पत्नी उषाताई जगताप, इंद्रजीत जगताप, अंजलीताई जगताप, चारुदत्त गुप्ते, नूतनताई गुप्ते, सुजाताताई गायकवाड यांच्यासहअन्य नातेवाईक तसेच प्रमुख अतिथी म्हणून जनता शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव श्री.वसंतराव जगदाळे, माजी जनरल सेक्रेटरी डॉ. राम भोस , माजी जनरल सेक्रेटरी श्री.लालासाहेब भुजबळ तसेच विविध शाखांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा हॉल उपस्थिततांच्या संख्येनेतुडूब भरला होता. सत्कारमूर्तींचा सत्कार शिवप्रतिमा,बुके, श्रीफळ, शाल देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. कल्याणी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपस्थित पाहुण्यांचा व जगताप कुटुंबीयातील आप्तेष्टांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रा. जयप्रकाश जगताप साहेब म्हणाले”जनता शिक्षण संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केलेली संस्था असून या संस्थेवर आमच्या कुटुंबीयांचे अतोनात प्रेम आहे. या संस्थेतील प्रत्येक घटक हा आमच्या कुटुंबाच्या घटक आहे. दादासाहेबांनी शिक्षकांना संस्थेचे सभासद करताना मोठा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवला होता. जनता शिक्षण संस्था माझी संस्था म्हणून सांभाळतील व वाढवतील दादासाहेबांनी संस्था उभारणी करताना मोठा त्याग केला असून त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून संस्थेचा विकास एकत्रितपणे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. जनता शिक्षण संस्थेच्या विकासासाठी “साथी हात बढाना”! “हाक तुमची! साथ आमची!”असेल आणि संस्थेच्या विकासासाठी आम्ही सदैव तयार आहोत. संस्थेला नावावर रूपाला कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करू!” जनता शिक्षण संस्थेचे माजी जनरल सेक्रेटरी डॉ. राम बोस यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ कल्याणी कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात जगताप कुटुंबीयांच्या संस्था उभारणीतील योगदानाचा इतिहास उपस्थितान पुढे मांडला . आपल्या अन्नदात्याविषयी कोणीही बेईमानी करू नये अशी भावनिक आव्हाने त्यांनी याप्रसंगी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक: प्रा. सुभाषरा्व जावळे यांनी केले त्यांनी कार्यक्रमा योजना मागचा हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन: प्रा. शालिनी सहारे यांनी केले तर आभार :प्रा. महेश तांबे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, सुधीर बहिरट,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.