

श्री गुरुदेव 🙏🏻
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा
पूर्वनियोजित पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम दिनांक 3/१०/२०२3 रोजी सकाळी ९ वाजता मू. पो. शिक्रापूर, चाकण चौक, पुणे नगर रोड, बजरंगवाडी, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे आयोजित केलेला आहे
तरी सदर कार्यक्रमाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक भक्तांची गर्दी होणार आहे
दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता जगद्गुरु श्रीच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक, संत पिठावर आगमन , सामाजिक उपक्रम निराधार महिलांना 25 शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे गुरुपूजन , आरती , प्रवचन , उपासक दीक्षा , दर्शन व पुष्पवृष्टी
असा एक दिवसाचा जगद्गुरुश्रींचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम होत आहे. दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन स्व – स्वरूप संप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था लोक उपयोगी उपक्रम 1)शैक्षणिक उपक्रम : गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य
2) वैद्यकीय उपक्रम : संस्थांच्या वतीने 42 ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीज येथे 24 तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे
3) कृषी विषयक उपक्रम :
गोर गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खाते औषधे शेती अवजारे वाटप केली जातात
4) आपत्कालीन मदत उपक्रम : दुष्काळ पडल्यास संस्थांच्या वतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो
5) अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम :
अंगारे दोरे धुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते
6) दुर्बल घटक मदत उपक्रम :
निराधार महिलांना घरघंटी शिलाई मशीन शेळ्या मेंढ्या दूपत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते
अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात