
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भंडारा डोंगर येथे महाराष्ट्रातून दररोज हजारो वारकरी व नागरिक दर्शनासाठी येत असतात.पायथ्याला रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या गाड्यांचा वेग जास्त असतो त्यामुळे वारकऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडताना लागतो.यासाठी रस्त्यावर गतीरोधक बसवावे या मागणीचे निवेदन आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग मावळ यांना मनसे जनहित कक्ष चे खेड तालुकाध्यक्ष विवेक येवले पाटील यांनी दिले व दि.27-10-2022 पर्यंत असे न झाल्यास 31-10-2022 रोजी पत्रातून आंदोलनाचा इशारा दिला.