स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. त्या स्वराज्याची संपत्ती असलेले किल्ले राखण्याचे काम रामोशी समाजाने केले. एवढेच नाही तर स्वराज्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचे काम सुद्धा राजे उमाजी नाईक यांनी केले.
राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेरड समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक असेल.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, रणजितसिंग नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल, गोपीचंद पडळकर, संजय जगताप, दौलतनाना शितोळे, योगेश टिळेकर, अभिमन्यू पवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला संपुर्ण महाराष्ट्रतुन समाज बांधव आले होते.
माननिय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी

