
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
दिनांक १४/०४/२०२३
“स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करुन वडीत महिलांची केली सुटका”
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची कामगि
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वेश्या व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, पिंपरी चिंचवड कडील पोलीस अधिकारी व अंमलदार वेश्याव्यवसाय करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना वाकड पोलीस स्टेशन हदीत स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलीकडुन वेश्याव्यवसाय करुन पे-या तसेच पैशाचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालांवर कारवाई करण्यात आली आहे
दिनांक १३/०४/२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत धनराज उर्फ धनजंय उर्फ राज वाघमारे असे नाव सांगुन मोबाईल वरून व्हॉट्सअॅप कॉल करुन हॉटेल बुक करण्यास सांगुन तेथे मुली पाठवुन वेश्याव्यवसाय करवुन घेतात अशी माहिती ळिाली होती.
अशा मिळालेल्या माहितीवरुन वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल बुक करुन बनावट ग्राहक पाठवुन पडताळणी करुन सापळा रचुन छापा टाकला असता आरोपीचे ताब्यातुन ०२ पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. सदर पिडीत मुली हया ०१ पश्चिम बंगाल व ०१ दिल्ली येथील आहेत. आरोपी धनराज उर्फ धनजय उर्फ राज वाघमारे व सचिन वाल्हेकर यांना अनैतिक मानव वाहतुक विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी सापळा रचुन पकडले आहे. आरोपीच्या ताब्यातुन व घटनास्थळावरुन जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे
१) ४०००/- रु रोख रक्कम २) ५०/- रु किं चे इतर साहित्य
(३) १५०००/- रु. कि.चे २२ मोबाईल फोन जुवा.कि.अं.
असा एकुण २०,०५०/-रु कि. चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन १) आरोपी धनराज उर्फ धनंजय उर्फ राज श्रीराम वाघमारे, वय २९ वर्षे सध्या रा जैन टेंपल, गगनगिरी हिल्स, कमान कोळगे बिल्डींग, कात्रज पुणे. मुळ पत्र- रामलिंग, घोडनदी ता. शिरूर जि. पुणे २) सचिन अजीनाथ बाल्हेकर वय २६ वर्षे रा. सध्या जैन टेंपल, गगनगिरी हिल्स, कमान कोळगे बिल्डींग, कात्रज पुणे. मुळ पत्त- ढोर गल्ली, माळीवाडा, जि. अहमदनगर पाहिजे आरोपी ३) रूपेश ४) राहुल (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांचे विरुद्ध वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं ३६६ / २०२२ भादवि कलम ३७० (३). ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल असुन अटक आरोपी यांना दिनांक १६/०४/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो, मा.पोलीस सहआयुक्त श्री. मनो लोहिया सो मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे सो, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे). डॉ. प्रशांत अमृतकर साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सॉळके, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाठ, मारुती करडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधवरेश्मा झावरे सोनाली माने यांनी केली आहे..
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970