


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त राजगुरुनगर शहरातील बस स्थानकासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन बसविलेल्या पुतळ्याला खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सह भिमशकती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक विजय डोळस तसेच राजगुरुनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनीही त्यांच्या सहकाऱ्यांसह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजगुरुनगर बसस्थानकामधयेही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले वास्तविक बसस्थानकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य फोटो लाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि स्मरण प्रवाशांच्या मनात कायम ठेवण्यासाठी असे उपक्रम निश्चितच समाज एकत्र येण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. खरेतर यांचे श्रेय विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली याच आगारात कार्यरत असणारे मोहन गोफनारायण यांनी अथक प्रयत्नांतून साकार केले आहे.आणि आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भिमशकती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक विजय डोळस यांच्या सह खेड तालुका अध्यक्ष अनिल जाधव विलास रोकडे तसेच येथील बसस्थानकाचे वाहतूक निरीक्षक पवळे साहेब आणि सर्व धर्मिय प्रवाशी उपस्थित होते.या प्रसंगी स्वराली रविंद्र कातोरे या शालेय विद्यार्थीनीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भाषण आपल्या उत्कृष्ट शैलीत सादर केल्यामुळे उपस्थितांची मने जिंकली याबद्दल तिला विजय डोळस यांच्या सह अनेकांनी बक्षिसांची खैरात केली.या प्रसंगी विजय डोळस उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला भारत देश कायम एकसंघ रहावा तसेच एकता,समता, बंधुता आणि स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी तसेच जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी राज्यघटना आणि संविधानाची निर्मिती केली त्यामुळे आज सर्व सामान्य नागरिकांना अनेक अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि आपण सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत कायम प्रज्वलित ठेवायला पाहिजे
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970