दि.०८/०४/२०२३रावेत पोलीस स्टेशन हद्दीत रावेत पोलीसांनी अवैध्य गॅस गोडऊन वर कारवाईरुन ६,०८,६५६ /- रू. किं.चामुद्देमाल जप्त केले बाबत.

Spread the love

दि.०८/०४/२०२३
रावेत पोलीस स्टेशन हद्दीत रावेत पोलीसांनी अवैध्य गॅस गोडऊन वर कारवाईरुन ६,०८,६५६ /- रू. किं.चा
मुद्देमाल जप्त केले बाबत.

दिनांक १४/०४/२०२३ रोजी पोशि/ २०५३ कचरे, पोशि/ २७२१ नविन चव्हाण, पोशि/ सतिश शिंदे असे रात्रगस्ती करीता रावेत पोलीस स्टेशन पिपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय येथे रा अगस्त करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मुंबई ते पुणे जाणारे हायवे रोडलगत असलेले तोरणा हॉटेल पुनावळे येथे एका पत्र्याचे शेड मध्ये काही इसम स्वतःची काळजी न घेता धोकादायक पध्दतीने व्यवसायिक गॅस टाकीमधुन काढून दुस-या गॅस टाकीमध्ये रिफिलींग करीत आहे अशी बातमी मिळालेने सदर बाबत लागलीच रात्रगस्त अधिकारी सपोनि पी आर शिकलगार सोो. यांना सांगीतले नंतर सहा. पोलीस निरीक्षक शिकलगार साहेब यांनी सदर बातमीचा आशय वपोनि शिवाजी गवारे यांना सांगितले असता. सपोनि पी आर शिकलगार पोशि/ २०५३ कचरे, पोशि/ २७२१ नविन चव्हाण, पोशि/ सतिश शिंदे यांनी सापळा लावून इसम नामे १) किशोरकुमार भाकरराम मेघवाल वय २२ वर्ष धंदा गॅस विक्री रा तोरणा हॉटेल मागे मुंबई पुणे हायवे पुनाव के ता हवेली जि पुणे मुळ मुलाणेरा तहसिल सोजता जि पाली राज्य राजस्थान २) रितेश सुरेश यादव वय २१ वर्ष धंदा गॅस विक्री रा तोरणा हॉटेल मांगे मुंबई पुणे हायवे पुनावळे ता हवेली जि पुणे मुळ छुटकी बेलहारी तहसिल बांज – डिंग, जि बलिया, राज्य उत्तरप्रदेश ३) राजाराम लालाराम बिष्णोई वय ३८ वर्षे धंदा गॅसविक्री रा तोरणा हॉटेल मागे मुंबई पुणे हायवे पुनावळे ता हवेली जि पुणे मुळ जभेश्रवर नगर शिवपुरी ता लोहावट जि जोधपुर राज्य राजस्थान यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता सदर गॅस गोडऊन चा मालक चौधरी असे सांगितले. सदर ठिकाणी १) ३२६५६/- रुपये किमतीचे १६ भरलेले व ६८,०००/- रुपये किमतीचे ४० रिकामे गॅस सिलेंडर २) ५,००,०००/- रुपये किंमतीचा महींद्रा पिकअप ३) ८,०००/- रू कि.चे रिफीलीग करण्याचे साहित्य व वजन काटे असा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी व मिळून आलेला मुद्देमाल रावेत पोलीस ठाणेस आण ुन गुरनं १७६/२०२३ भा.द.वि.सं.कलम ४२०,२५८,३४ सह जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३,७ सह एल पी जी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साो., मा. सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया सो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे सो श्री काकासाहेब डोळे साो. पोलीस उप आयुक्त परी-२, सहा पोलीस आयुक्त पदमाकर घनवट सो, देहूरोड विभाग देहूरोड व शिवाजी गवारे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रावेत पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शिकलगार सहा पोलीस निरीक्षक जाधव, सपोफी, गवारी, मपोहवा / १३८० मेहता, पोना / १४८२ गुजर, पोशि/ २०५३ कचरे, पोशि/ २७२१ नविन चव्हाण, पोशि/ १३०९ रणदिवे, पोशि/ २१६० तांबे व पोशि सतिश शिंदे यांनी केली आहे.

(डॉ. काकासाहेब डोळे)

पोलीस उप आयुक्त परीमंडळ-२, पिंपरी चिंचवड

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents