चारचाकी वाहन चोरी करणार अट्टल गुन्हेगारांस आळेफाटा पोलीसांनी केली अटक. अट्टल गुन्हेगाराकडून १,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

पुढे सोयीस्कर बातमी पहा

पुणे आळेफाटा प्रतिनिधी मंडलिक

चारचाकी वाहन चोरी करणार अट्टल गुन्हेगारांस आळेफाटा पोलीसांनी केली अटक. अट्टल गुन्हेगाराकडून १,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

मौजे आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत पसायदान कॉम्प्लेक्स, नगर रोड येथून दि. २/४/२०२३ रोजी रात्री ११:५५ वा. ते दि. १०/४/२०२३ रोजी पहाटे ०५:०० यांचे सुमारास फिर्यादी नामे भिमाशंकर सखाराम आवटे यांचे मालकीचे त्यांनी पार्किंग करून ठेवलेले महेंद्रा बोलेरो कंपनीचे केन के. एमएच ०४ डीटी ०२८३ हे त्यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीच्या इरादयाने कोणातरी अज्ञात चोरट्याने स्वतः ये फायदयासाठी चोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत फिर्यादी भिमाशंकर सखाराम आवटे वय ५९ वर्षे, रा. पसायदान कॉम्प्लेक्स, नगररोड आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं. १५९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दिनांक १०/०४/२०२३ रोजी गुन्हा करण्यात आला होता.

सदर दाखल गुन्हयामध्ये केन चोरीला गेल्याने तसेच आजुबाजुच्या परीसरातून चारचाकी वाहने चोरीला जात असल्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलावडे यांनी पोलीस स्टेशनकडील स्टाफची पथके बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथक अधिकारी सपोनि श्री. सुनिल बडगुजर व पथकाने सदर गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषन करून व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळवून त्यानुसार यातील अज्ञात आरोपीचा माग काढत राजु बाबुराव जावळकर वय ५५वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्टमेट, फ्लॅट नं. ४०३, डोणजे फाटा ता. हवेली जि. पुणे. यांस पुणे येथे जावन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुबंधाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देवून सदरचे क्रेन हे अंगद पुनम यादव सध्या रा. कळंबोली, मुंबई, मुळ रा. आझमगड, राज्य उत्तरप्रदेश यांस विकले असल्याचे सांगितले आहे. सदर आरोपी नामे अंगद पुनम यादव याचा शोध घेणेकामी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून सदर आरोपीस लवकरात लवकर अटक करीत आहोत..

सदर गुन्हयातील आरोपी नामे राजु बाबुराव जावळकर वय ५५वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्टमेट, फ्लॅट नं. ४०३, डोणजेफाटा ता.हवेली जि. पुणे. यांस पुणे यांच्याकडून त्याने गुन्हयात वापरलेले वाहन स्कॉपिओ वाहन क्र. एम. एच. १६/अ.जी. ४०४४ तसेच सदर गुन्हयातील केन विकलेल्या पोटी आलेले ४०,०००/- रुपये असा एकूण १,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत करून तो गुन्हयाचे कामी जप्त केला आहे.

सदरची कामगिरी हि मा. श्री अंकीत गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. मितेश घट्टे सो अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा. मंदार जवळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पो.स.ई पवार, पो. हवा, विनोद गायकवाड, पो. हवा. नरेंद्र गायकवाड, पो. हवा भिमा लोंढे, पो. ना संजय शिंगाडे, पो.ना.पंकज पारखे, पो. कॉ. अमित माकुंजे, पो. कॉ. नवीन अरगडे, पो. कॉ. हनुमंत ढोबळे, पो. कॉ. प्रशांत तांगडकर यांनी केली आहे.

अस्सल न्यूज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents