

वाहनाच्या धडकेत माकडाचा दुर्दैवी मृत्यू..
नांदगाव खंडेश्वर :- गुरुवार दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 03 वाजता नांदगाव ते मोखड रोडवर अज्ञात वाहनेच्या धडकेत माकड जखमी झाल्याची घटना मिळतात. पर्यावरण प्रेमी ओम मोरे, सिद्धार्थ अंभोरे, गौरव शेंडे व मनीष चौधरी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व जखमी माकडाला प्रथम उपचार करण्याकरिता जवळ घेतले. पण माकडाच्या इजा खूप मोठी असल्याकारणाने घटनास्थळीच माकडाचा (मादी) दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण घटना महाराष्ट्र वन वन विभागाला कळविण्यात आली. सादर घटनेनंतर माकडाला माती देण्यात आली.