


प्रतिनिधी. सचिन आल्हाट
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती चे नवनिर्वाचित सभापती adv विजयसिंह शिंदे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कृषी उत्पन्न बाजार समिती उपकेंद्र महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथे शेतकरी, हमाल, आडते, व्यापारी तसेच मापाडी यांची वेळोवेळी मार्केटमध्ये आल्यानंतर जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चक्रेश्वर महाराज भोजनालयाच्या माध्यमातून ४० रुपये थाळी अशा अल्प दरात पोटभर व स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिंदे पाटील यांनी बोलताना सांगितले की मानवतेच्या दृष्टीने मानवी जीवनामध्ये पोटभर जेवण हे फार महत्त्वाच आहे. सर्वसामान्य शेतकरी वर्ग गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी बाजार समिती अहोरात्र काम करणार तसेच सर्वांची जेवणाची व्यवस्था झालीच परंतु पुढील काळात स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय यावरही भर दिला जाणार आहे. गेल्या ७५ वर्षाच्या कालखंडात कृषी उत्पन्न बाजार समिती खेड येथे हा उपक्रम प्रथमच राबवला असल्याने सभापती शिंदे पाटील व सर्व संचालकांचे शेतकरी, हमाल मापाडी तसेच तालुक्यातील नागरिकांकडून थेट कृतिशील सभापती म्हणून कौतुक होत आहे.