


प्रतिनिधी लहू लांडे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील संयुक्त ग्रामपंचायत मांजरेवाडी येथील सलग दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरपंच सौ अनिता विलास मांजरे यांनी हळदीकुंकू समारंभ व कालदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर हर्षला गावडे व दिपाली चौरे यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. त्यामध्ये मासिक पाळी, विविध रोग, चांगले आरोग्य कसे राखावे, स्त्रियांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, लहान वयोगटापासून मोठ्या वयोगटापर्यंत आहार आरोग्य कसे राखावे यासंदर्भामध्ये तुला मोलाचे मार्गदर्शन केले. आरोग्य विषयी सर्व चांगल्या प्रकारची माहिती मिळाल्यामुळे सर्व आलेल्या जवळपास १३०० ते १५०० महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी आलेल्या सर्व महिलांनी हळदी कुंकू लावून तिळगुळाचा वाटप करून भेट वस्तू देण्यात आली.हा हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभ गेले सात वर्षापासून साजरा करत आहे. या समयी मांजरेवाडी, होलेवाडी रेटवडी, खरपुडी ,निमगाव , दावडी,काळुस, गुळाणी, राक्षेवाडी परिसरातील महिला अनेक गावच्या सरपंच महिला,अनेक मान्यवर आणि मांजरेवाडी येथील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वात शेवटी आलेल्या सर्व महिलांना मोठ्या मानापणाने सन्मानित केले. सर्व महिलांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. येणारी जिल्हा परिषद २०२५ ची निवडणुक सौ अनिताताई विलास मांजरे यांनी लढवावी अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करून सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अशोक भाऊ मांजरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कांचनताई मांजरे यांनी केले. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विलास शेठ मांजरे , आदर्श उद्योजक प्रवीण मांजरे ,संजय मांजरे , आणि मांजरेवाडी गावातील ग्रामस्थांचे यांनी मोलाचे सहकार्य लाभले असे स्पष्ट मत सरपंच अनिताताई मांजरे यांनी व्यक्त करून आभार मानले.