

संगमनेर
मोक्षा स्कूल ऑफ योगाचे ओझोन योगा हे सेंटर मागील वर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू करण्यात आले आमचे विद्यार्थी देशाविदेशात लोकांना शास्त्रशुद्ध योगाचे धडे देत आहेत व लोकांचे आरोग्य सुदृढ करत आहेत मग त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपल्या संगमनेरच्या जनतेला व्हावा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन ओझोन योगा सुरू करण्यात आले आहे सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत आपण एक वर्ष पूर्ण करत असल्याने प्रथम वर्धापन दिन साजरा करत आहोत त्या प्रित्यर्थ मोफत योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे नऊ नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य योग वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय दररोज संध्याकाळी आहार नियोजन वजन व्यवस्थापन तणाव निर्मूलन योगाच्या माध्यमातून विविध आजारांवरती उपचार प्राणायाम आणि ध्यान अशा विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन तज्ञांच्या मार्फत करण्यात आले आहे 14 नोव्हेंबर रोजी सूर्यनमस्कार स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व सहभागींना सहभागीता प्रमाणपत्र व प्रथम येणाऱ्यास पुरस्कार प्रदान केला जाणार आहे 15 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण आणि प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व इतरांनाही सांगावे असे आवाहन ओझोन योगासंगमनेर टीम कडून करण्यात आले आहे
